Friday, November 20, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पंतप्रधान मोदी यांनी २४ मार्च हा दिवस ‘महापश्चाताप’ दिन म्हणून साजरा करावा….! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : ‘स्वतंत्र भारताचे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना – दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे… वास्तविक ते फाळणी नंतर च्या “स्वतंत्र भारताचे पंतप्रधान” आहेत..! फाळणीच्या वेळी दोन्ही देशातील एक कोटी 40 लाख लोक स्थलांतरित झाले होते. फाळणी नंतर, भारत भूमिवर प्रेम करणारी जनता ‘स्वतंत्र भारतात’ राहीली, त्यांची संख्या सु ३३ कोटी होती.. व ईस्लाम राष्ट्र म्हणून ऊदयास आलेले ‘पाकिस्तान’ची लोकसंख्या सु १५कोटी होती…!

मात्र मोदीजींनी ‘स्वतंत्र भारतात’ अचानक तुघलकी थाटात (कोरोना रूग्ण संख्या शेकड्या मध्ये असतांना) रात्री १२ नंतर एकाएकी ‘देशभर जी टाळेबंदी’ केली.. त्या मुळे जे ‘पर प्रांतीय’ मजूर स्थलांतरीत झाले.. पायास फोडे पडून, हाल अपेष्टा सहन करत शेकडो मैल चालत गेले व स्थलांतरीत झाले त्यांची संख्या तब्बल साडे आठ (८।।)कोटी आहे…! या मजूर आणि नागरिकांना नाईलाजाने व पंतप्रधानांनी देशावर लादलेल्या टाळेबंदी मुळे स्थलांतर करावे लागले..! स्वतंत्र भारतातील हे सगळ्यात मोठे आणि फाळणीच्या काळातील स्थलांतरपेक्षा ८ पट मोठे स्थलांतर होते, त्यामुळे 24 मार्च या दिवसाच्या निर्णयामुळे ‘स्वतंत्र भारतातील’ हाल-अपेष्टा सहन कराव्या लागणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड मोठी असल्याने, पंतप्रधान यांनीच आता दर वर्षी 24 मार्चला ‘प्रायश्चित्त’ घ्यायला हवे आणि तो दिवस ‘महा पश्चाताप दिन’ म्हणून साजरा करावा असे वक्तव्य काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले आहे..!!!

Leave a Reply