पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 244 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक असून आज दोनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 218नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 244रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 90 हजार 446 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 79हजार 501इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 10 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 6 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8847जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2098 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
त्यापैकी 204 रुग्ण गंभीर आहेत
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8876 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
