Picsart आता मराठी मध्ये सुद्धा
नवी दिल्ली : जगातील अग्रगण्य क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म, Picsart, पिक्सआर्ट सध्या दोन भाषा हिंदी आणि बंगाली मध्ये आहे, आता व्यतिरिक्त ते आणखी दोन प्रादेशिक भाषांना जोडून भारताचे स्वातंत्र्य आणि भाषेंतील विविधता साजर करत आहे. यासह, हे अॅप भारतातील प्रदेशांच्या प्रमुख भाषांचा समावेश करत आहे.
भारत-केंद्रित वैशिष्ट्यांसह, Picsart ने देशाच्या सहस्राब्दी लोकसंख्येला ही विविधता शक्य तितक्या सर्जनशील मार्गाने व्यक्त करण्याची संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
स्वातंत्र्यदिनाला अधिक विशेष बनवण्यासाठी, Picsart ने चार नवीन भारतीय टेक्स्ट फोंट, इंडियन म्यूजिक आणि रोमांचक स्टिकर्स आणि रिप्ले देखील सादर केले आहेत जे वापरकर्त्यांना त्यांच्या भारतावरील प्रेमाचे चित्रण करण्यासाठी विशेष सामग्री तयार करण्यास मदत करतील. Picsart भारतीयांना फिल्टर, रिप्ले, स्टिकर्स आणि अॅपमध्ये उपलब्ध फॉन्टच्या विशेष श्रेणीच्या मदतीने सामग्री तयार करण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न करते.
Picsart, इंडियाचे कंट्री हेड रवीश जैन म्हणतात, “७५ वा स्वातंत्र्य दिन सर्व भारतीयांसाठी विशेष आणि भावनिक आहे. जो स्वतंत्रता साध्य करण्यासाठी केलेल्या अनेक बलिदानाची आठवण करून देते. Picsart, या उत्सवाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे आणि अॅपमध्ये हिंदी आणि बंगालीसह मराठी आणि तामिळ या दोन नवीन भाषा जोडल्या जात आहेत. असे करताना, Picsart,चे लक्ष्य स्थानिक समजापर्यंत पोहोचणे ,त्यांना प्रमुख भारतीय भाषांमध्ये कंटेट तयार करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. “
