Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांनी केले बैलगाडा शर्यतीचे आयोजन

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात आता बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. कारण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी असताना आमदार पडळकर यांनी येत्या २० ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ते द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळी बक्षिसे दिली जाणार आहेत.

Leave a Reply