Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

शिर्के वाडयात पुरंदरे यांना इतिहासप्रेमींतर्फे ‘जन्मस्थान मानवंदना’


पुणे : पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची ख्यात आज जगभर पसरली आहे, ठिकठिकाणी त्यांच्या जन्मशताब्दीचे कार्यक्रमही होत आहेत, परंतु त्यांचे जन्मस्थान असलेल्या शुक्रवार पेठेतील शिर्के वाडयात जमून इतिहासप्रेमींनी त्यांना अनोखी मानवंदना दिली. त्यांचे हे जन्मस्थान अनेकांना माहित नसल्याने येथे भव्य फलक लावून पुष्पसजावट करण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करुन त्यांचा वयाच्या शताब्दीकडे वाटचाल करणारा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

इतिहास प्रेमी मंडळातर्फे शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ चौकाजवळ असलेल्या शिर्के वाडयात शिवशाहिरांना जन्मस्थान मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे, जाणता राजा नाटकात काम केलेले कलाकार चंद्रशेखर कोष्टी, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. 

शाहीर हेमंतराजे मावळे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर रचलेल्या पोवाडयाचे सादरीकरण केले. त्यामध्ये बाबासाहेबांच्या जन्मापासून ते त्यांनी केलेल्या उत्तुंग कार्यापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला. तसेच बाबासाहेबांकडून खूप काही शिकण्यासारखे असून त्यांचा वक्तशीरपणा हा गुण मी घेतला असल्याचे मावळे यांनी सांगितले. 
मोहन शेटे म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लहानपणीच्या अनेक आठवणी आहेत. शिर्के वाडयामध्ये ते रहात असताना, अनेक गमतीशीर किस्से देखील ते आजही सांगतात. मंडईमध्ये शाहिरांचे कार्यक्रम ऐकण्यासाठी ते लहानपणी जात असत. त्यामुळे इतिहास काव्यात्मक पद्धतीने शाहिरी पद्धतीतून देखील मांडता येईल, याचे धडे बाबासाहेबांनी लहानपणीच घेतले होते. वयाच्या शंभराव्या वर्षी देखील त्यांची स्मरणशक्ती उत्तम असून त्यांना यापुढेही आरोग्यसंपन्न दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना आपण करुया, असेही ते म्हणाले. 
शिवशाहिरांचे वडिल मोरेश्वर पुरंदरे यांचे बाबासाहेबांवर झालेले संस्कार, त्यांना लागलेली इतिहासाची गोडी, बालपणीचे सवंगडी, स्वातंत्र्यसंग्रामातील घटना, नाटक-चित्रपट व लोककलावंतांचे आकर्षक, दुर्गभ्रमंती, शिवचरित्र लेखनाची प्रेरणा असा अचंबित करणारा बाबासाहेबांचा प्रवास यावेळी मान्यवरांनी उपस्थितांसमोर उलगडला. चंद्रशेखर कोष्टी यांनी जाणता राजा मधील भूमिका यावेळी सादर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading