Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 238 कोरोनाचे नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक असून आज दोनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 238 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 237 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 89 हजार 970 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 79 हजार 008 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2125 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत.
त्यापैकी 198 रुग्ण गंभीर आहेत
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 9211 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading