Thursday, November 19, 2026
ENTERTAINMENTLatest News

संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ वेबसिरिजमध्ये वेश्यांची कथा

बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांना ओळखले जाते. यातच भन्साळींनी एका नव्या मोठ्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी भन्साळींनी ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची घोषणा केली. यानंतर भन्साळी आता प्रथमच वेबसीरिजच्या दुनियेत पदार्पण करणार आहेत. त्यांनी आपण लवकरच एका वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता भन्साळींच्या नव्या कोऱ्या पहिल्या वेबसीरिजचे वेध लागले आहेत.

या नव्या वेबसीरिजमुळे गेल्या काही दिवसांपासून भन्साळी सोशल मीडियावर चर्चेत होते. या वेबसीरिजचे नाव आहे, ‘हीरामंडी’. लाहोरच्या वेश्याची गोष्टी या वेबसीरिजमधून उलघडली जाणार आहे. या सीरिजमध्ये लाहोरबरोबरच हिरामंडीदेखील दिसणार आहे. या वेबसीरिजमधून भन्साळी एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

भन्साळींनी आपल्या वेबसीरिजविषयी सांगताना लिहिले की, हिरामंडी ही निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे. तो एक मैलाचा दगड ठरणार असून ते एक महाकाव्य आहे. जे लाहोरच्या वेश्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अशाप्रकारची ही पहिली सीरिज करणार असल्याने हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी उत्साही आहे. मात्र जरा काळजी देखील वाटतेय कारण वेबसीरिज विश्वात काम करताना जपून चालावं लागणार आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4136125136501195&id=863997413714000

Leave a Reply