Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

धनकावडीमधील मैदानाचा पुतळ्यापाठोपाठ नामकरणाचा वाद पेटला

पुणे:धनकवडी मधील आंबेगाव पठारमध्ये नवीन गार्डन करण्यात येत आहे .रासपच्या वतीने व उपाध्यक्ष बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून छत्रपती संभाजी राजे बोर्ड गार्डनला लावण्यात आला. आतील प्रांगण -पटांगण याला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावे व नवीन वाचनालय करून त्याला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाव देण्यात यावे. अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजी राजेंचा गार्डनला बोर्ड लावण्यात आल्यानंतर हलग्या वाजवून आंनद साजरा करण्यात आला.

गार्डनमध्ये राममंदिराचे शिल्प देखील उभारण्यात येणार असून याला आमचा कसलाही विरोध नाही. परंतु प्रवेशद्वाराला छत्रपती संभाजीराजे नाव द्यावं ,.आतील प्रांगण -पटांगण याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव द्यावं,.व नवीन वाचनालय करून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाव द्यावं अशी माहिती उपाध्यक्ष बालाजी दादा पवार यांनी यावेळी दिली .
यावेळी रासपचे पुणे शहर अध्यक्ष विनायक रुपनवर ,उपाध्यक्ष बालाजी पवार ,संपर्क प्रमुख अंकुश देवडकर ,युवक अध्यक्ष उमेश कोकरे ,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सविता ताई जोशी ,राजश्री ताई माने ,स्नेहा यादव व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading