fbpx
Monday, May 20, 2024
BusinessLatest News

प्रोडिजी फायनान्सची अमेरिकेतील १२ नव्या विद्यापाठांशी भागीदारी

मुंबई : परदेशातील शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठीची वचनबद्धता अधोरेखित करत, प्रोडिजी फायनान्स, विदेशात पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सकरिता कर्ज देणाऱ्या प्रसिद्ध क्रॉस बॉर्डर फिनटेक प्लॅटफॉर्मने, नुकतेच अमेरिकेतील १२ प्रतिष्ठित विद्यापीठांचे सहकार्य मिळवले आहे. यात बेंटले युनिव्हर्सिटी, हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूल, युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ डकोटा, युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न मिसिसिपी, मायो ग्रॅज्युएट स्कूल, मियामि हर्बर्ट बिझनेस स्कूल, नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी-युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना- चॅपेल हिल, जॅकसन स्टेट युनिव्हर्सिटी, मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटी, साउथ डकोटा स्टेट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मेमफिस आणि ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स य युनिव्हर्सिटी आदींचा समावेश आहे.

या धोरणात्मक भागीदारीद्वारे विद्यार्थ्यांना बिझनेस, सायन्स आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या व्यापक यादीतून निवडण्याची संधी मिळेल. तसेच यशाच्या मार्गावर आवश्यक कौशल्ये वाढवण्याचीही सुविधा मिळेल.

प्रोडिजी फायनान्सचे कंट्री हेड, इंडिया, मयांक शर्मा म्हणाले, “अमेरिका हे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणासाठीच्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे माहेरघर आहे. अतिरिक्त १२ कॉलेज आणि संस्थांसोबत भागीदारी करून, २०२१ मध्ये आणि त्यानंतरही भारतीय विद्यार्थ्यांना विदेशातील स्वप्न साकार करण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होतील, अशी आम्हाला आशा आहे. जगातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांशी विद्यार्थ्यांना जोडून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणण्याकरिता आम्ही वचनबद्ध आहोत.”

प्रोडिजी फायनान्सने पोर्टफोलिओच्या मालिकेत नवी १२ कॉलेज जोडून, सध्या ८०० पेक्षा जास्त कॉलेजद्वारे १००० पोस्टग्रॅज्युएट प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी प्रदान केले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading