पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये गुणवंतांचा सत्कार
पुणे : पुणे इंटरनॅशनल स्कूल सदैव आपल्या सोबत असून भविष्यात आपणास कोणतीही अडचण आल्यास मार्गदर्शन करण्यासाठी तयार असल्याचे मत चलवादी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले. विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या वतीने आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना ते बोलत होते.
यावेळी पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या उपाध्यक्षा ऍड रेणुका चलवादी ,प्राचार्या स्मिता लोंढे ,व्यवस्थापिका सायली शिंदे ,उपप्राचार्या बिना कदम ,जयश्री कदम ,ज्योती सचदेव ,आश्विनी मोहिते ,नंदा सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी इयत्ता दहावी( एस.एस.सी बोर्ड )मधील चिन्मयी कुरवाडकर ९२.८० टक्के गन मिळवून पहिली आली ,कशीष कुंभार ९२.२० टक्के गुण मिळवून दुसरी ,व खुशी सहारे ८६.४० टक्के गुण मिळवून तिसरी आली तशेच (सी .बी.एस.ई बोर्डाच्या ) ऋषिकेश इचे हा९३.२० टक्के गन मिळवून प्रथम , पलक सिंग ९३.२०टक्के गुण मिळवून द्वितीय व शान खान हा ९१.२० टक्के गुण मिळवू तृतीय आला. तर इयत्ता बारावी सायन्स मधील ऐश्वर्या बनसोड ८८टक्के गुण मिळून प्रथम ,विनिता चौधरी ८६टक्के गुण मिळवून द्वितीय,मोनिका चौधरी ८५टक्के गन मिळवून तृतीय क्रमांक पटकावला तर वाणिज्य शाखेतील सोनाली राव ८६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक ,जीन दिकास्ट्रो ८२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर धीरज आगरवाल ८१.५ टक्के गन मिळवून तृतीय आला तशेच कला शाखेतील महेश गिलबिले ७६टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक ,ईशा फ्रांसिस ७५ टक्के गुण मिळवून द्वितीय व थेवर इसाकिताई ७४टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला तर विश्वभारती माध्यमिक विद्यालयामध्ये सोनाली चलवादी ७०.१४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक ,अंजली साळवे ६८.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर दीपाली सगर ६५ टक्के गुण मिळाले .या सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह ,पुष्पगुच्छ व मिठाई देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
