Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRA

रागाच्या भरात पोटच्या लेकानेच केली जन्मदात्या आईची धारदार शस्त्राने हत्या

सातारा : रागाच्या भरात पोटच्या लेकानेच जन्मदात्या आईची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. मुलाने वार केल्यानंतर वयोवृद्ध असलेली आई मदतीसाठी आक्रोश करत होती. मात्र तरीही मुलाला पाझर फुटला नाही. शेवटी त्या आईचा मृत्यू झाला. शहाजी पवार असे आरोपीचे नाव आहे.  ही घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर बसस्थानक भागात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलाबाई पवार (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे. वयोमानानुसार त्या चिडचिड करत असत. तशाच प्रकारचा वाद आज माय – लेकांमध्ये झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. लेकाला राग आवरला नाही. अन् शहाजी यांनी  रागाच्या भरात आईवर धारदार शस्त्रांनी वार केले. आईचा खून केल्यानंतर घरात शांतता पसरली. शेवटी आरोपी शहाजी याला आपल्या कृत्याची  जाणीव झाली. त्याला पश्चात्ताप झाला. त्यानंतर आरोपीने रहिमतपूर पोलीस ठाण्यात जावून आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून  त्याच्या घरी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, आरोपीने स्वत:च्या आईची हत्या का केली? याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading