टेनिसपटू सानिया मिर्झाने ८ लाख विद्यार्थ्यांचा घेतला फिटनेस व योगासंदर्भात MasterClass
मुंबई, : के-१२ विभागामधील एडटेक प्रमुख लीडने भारतभरातील त्यांच्या सहयोगी शाळांच्या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी त्यांचा दुसरा MasterClass सुरू केला. याअंतर्गत पद्म भूषण पुरस्कार-प्राप्त सानिया मिर्झा विद्यार्थ्यांना फिटनेस व योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली अवलंबण्यास प्रेरित करत आहेत. टेनिस चॅम्पियन सानिया मिर्झा यांनी कमी झालेली शारीरिक हालचाल व चिंता या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक व्यायामाचे महत्त्व सांगितले.
MasterClass सह लीडने प्रख्यात तज्ञांसोबत सहयोग करत शालेय विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व वाढीचे महत्त्व पटवून देण्याकरिता उद्योगक्षेत्रातील पहिला उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तज्ञांकडून त्यांचे ज्ञान व अनुभवाची माहिती मिळते. या उपक्रमापूर्वी लहान नगर व शहरांमधील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या संधी उपलब्ध नव्हत्या. सर्जनशील लेखनावरील पहिला MasterClass प्रख्यात लेखक चेतन भगत यांच्यासह आयोजित करण्यात आला.
स्पोर्टस् आयकॉनसोबतचा ‘फिटनेस व योगा‘वरील MasterClass विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी संपन्न अनुभव देणारा होता. या मास्टरक्लासमध्ये (MasterClass) सानिया यांनी ‘तंदुरूस्त राहण्यासाठी अंतर्गत शक्ती निर्माण करण्यासोबत स्नायूंना बळकटी देणे‘ हा त्यांचा मंत्र सांगितला. काहीही करून स्वप्ने साकारण्यावर प्रबळ विश्वास असलेल्या त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शिस्तीचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच त्यांनी क्रीडा व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांमध्ये कशाप्रकारे यशस्वी कामगिरी केली याबाबत देखील सांगितले.
सानिया यांनी मातांना महामारीदरम्यान त्यांच्या मुलांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम असण्यासाठी त्यांच्या भूमिकेबाबत, तसेच फिटनेस व्यायाम करत स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घेण्याबाबत सांगितले.
सानिया मिर्झा म्हणाल्या, ”आपली स्वप्ने साकारण्याच्या आपल्या कटिबद्धतेच्या मार्गात महामारीचा अडथळा आला नाही पाहिजे. फिटनेस व योगा हे आजच्या मुलांसाठी त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य प्रबळ करण्याचे उत्तम मार्ग आहेत. आरोग्यदायी शरीर व मन सर्वांगीण विकास व शिक्षणासाठी आवश्यक आहे. सद्यस्थितीमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांना या संधी देणे महत्त्वाचे आहे.”
