Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने कोकणातील पूरग्रस्त बांधवांना मदत

पुणे – भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने कोकणातील पूरग्रस्त बांधवांना मदत पाठविण्यात आली. भाजपाचे शहरअध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष अन्वर पठाण यांनी 500 कुटुंबांसाठी किराणामाल, कपडे, जीवनावश्यक साहित्य व आवश्यक इतर वस्तू पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवण्यात आल्या. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.माजी स्थायी समिती अध्यक्ष व नगरसेवक योगेश मुळीक व या उपक्रमाचे संयोजक अल्पसंख्यांक मोर्चाचे शहराध्यक्ष अन्वर पठाण यांच्या प्रमुख उपस्थिती हे साहित्य रवाना करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे सरचिटणीस मुस्तफा पटेल , उपाध्यक्ष राजेश पासी, महिला अध्यक्षा मिनाझ शेख , युवा प्रमुख (शीख) कवलदीप कटनोरिया , महिला अध्यक्षा फरियाज फलाजी ,सहअध्यक्षा अपर्णा चक्रवर्ती , महिला उपाध्यक्षा अमरीन शेख ,जरीन शेख, हुसेन शेख, अमीर शेख, सागर काळे, राहुल चांडलीया, शकील शेख, सलीम शेख,शाहरुख शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply