Tokyo Olympics 2020 -21: ऐतिहासिक – भारतीय हॉकी टीमला 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझ पदक
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एका ब्रॉंझपदकाची कमाई केली आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. भारतीय हॉकी संघाला 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली आहे. उपांत्य फेरीत भारताचा बेल्जियमकडून पराभव झाला होता. तर जर्मनीचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. आज झालेल्या या दोघांमध्ये ब्रॉंझपदकासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली.
भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक इतिहासात आठ सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली आहे. यापैकी अखेरचे सुवर्णपदक मॉस्को ऑलिम्पिकमध्ये 1980 मध्ये मिळवले होते.
भारत आता 5-4 ने आघाडी घेतली होती आणि ही आघाडी कायम राखत विजय मिळवा. सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली आहे. सामना सुरु होताच जर्मनीकडून (Germany) आक्रमक खेळी करण्यात आली. बचावात्मक खेळी करणाऱ्या भारतीय (India) संघावर जर्मनीकडून दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु होता. पहिल्या क्वार्टरच्या दुसऱ्याच मिनिटाला जर्मनीने पहिला गोल करत आघाडी घेतली आणि आपली चुनूक दाखवून दिली. लाँग कॉर्नरचा जर्मनीने पुरेपूर फायदा घेत हा गोल केला. त्यानंतर भारतीय टीमनेही आक्रमक खेळ करत गोल करत जर्मनीवर मात केली आहे. भारताने आपला खेळ उंचावत 5-4 ची आघाडी घेतली आहे.
भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्यात वर्चस्व मिळवले. भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळी दाखवत पाचवा गोल केला. भारताने आणखी गोल करत 5-3 आघाडी घेतली. त्याआधी रुपिंदर पालने पेनल्टी स्ट्रोक मारत भारताला चौथा गोल करुन दिला. भारताने सामन्यात 4-3 ने आघाडी घेतली.
मात्र भारताने पुनरागम करत दुसरा गोल केला. हार्दिक सिंह याने केलेल्या गोलमुळे भारताला दिलासा मिळाला. यानंतर भारताने हाफ टाइमच्या आधी अजून एक गोल करत 3-3 ने बरोबरी केली. तर दुसऱ्या क्वार्टरपर्यंत जर्मनीने 2-1 आघाडी घेतली होती. यानंतर सलग अजून एक गोल करत जर्मनीने 3-1 ने भारताला पिछाडीवर टाकले. दरम्यान, भारताने पहिल्या 15 मिनिटांमध्ये स्कोअर 0-1 होता. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीतने गोल करत बरोबरी केली.
