Sunday, September 27, 2026
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

Tokyo Olympics 2020 -21: भारताच्या लवलीना बोरगोहेनला बॉक्सिंग मध्ये ब्रॉंझ मेडल

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain) सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. आज सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेली (Busenaz Surmeneli) कडून 5-0 ने पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे तिला पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला नसला तरी ब्रॉंझ मेडल मिळाले आहे.

ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी भारतीय बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे. याआधी 2008 मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर 2012 लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे लवलीनाने पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक जिंकली आहे.

पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या 23 वर्षीय लवलीनाचा हा 10 वा पराभव होता. तिने आतपर्यत 14 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे सेमीफायनल जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या टर्कीच्या बुसानाजचा हा 26 वा विजय होता तिने केवळ 6 सामने गमावले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading