fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

तुळशीबागेत निनादला घंटानाद

पुणे : पुण्यातील निर्बंध कायम ठेवल्याने पुणे व्यापारी महासंघाने घंटानाद आंदोलन आयोजित केले होते ..त्यात तुळशीबाग व्यापारी असोसिएशन व गणपती चौक लक्ष्मी रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापारी सहभागी झाले होते..

पुणे शहरातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट सतत कमी होत असताना निर्बंध शिथील करणे आवश्यक असताना ते न करता झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आज घंटानाद आंदोलन करण्यात आले…..
लशींच्या दोन्ही डोस घेवून लोकांनी घरीच बसावे, का?
मग लसीकरणांचा उपयोग काय ?
आता खुपऽऽ झालं…!
आम्हाला काम करू द्या ..!
कोरोनाचे नियम पाळून काम करू ,
काम करू द्या काम….. !! आम्हाला ‘ आमच्या ‘ कष्टाने पैसे कमवू द्या …..!….
अशा भावना व्यक्त केल्या….तुळशीबाग व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष नितीन पंडीत आणि गणपती चौक लक्ष्मी रोड व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष संजय मुनोत यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन पार पडले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading