Friday, September 25, 2026
Latest NewsPUNE

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी पुरस्कार बाबू कांबळे यांना प्रदान

पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी पुरस्कार मराठवाडा नामांतर लढ्यातील शहीद , व दलीत पँथरचे लढाउ असे पोचिराम कांबळे यांचे चिरंजीव बाबू कांबळे यांना पुण्यनगरीच्या उपमहापौर व पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सभासद व भाजपचे शहर सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त 1 ऑगस्ट पासून परशुराम वाडेकर यांनी संस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सामाजिक ,वैचारिक ,शाहिरी जलसा यासह विविध कार्यक्रम सुरू आहेत .त्यामध्ये आज बाबू कांबळे यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
परशुराम वाडेकर यांनी प्रास्तविक भाषणात दलीत पँथर च्या व नामांतर लढ्यातील आठवणी सांगितल्या . पोचिराम कांबळे यांचा बाबत एक आठवण सांगताना त्यांना रडू ही कोसळले .त्यांचा कार्याची व बलिदानाची जाणीव म्हणून आज या पुरस्कार समारंभ ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
राजेश पांडे यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे सांगितले.त्यासाठी ही जबाबदारी सर्वांची असल्याचे म्हंटले आहे.
उपमहापौर सुनीताताई वाडेकर आपल्या मनोगतात बोलताना लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात आणि चित्रपटात महिलांना पहिल्यांदा नायिका केले .शिवाय महिलांना त्यांनी साहित्यात अतिशय मोलाचे स्थान दिल्याचे या वेळी सांगितले.

या सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात यशवंत भिसे (जेष्ठ कार्यकर्ते), शंकर तडाखे (अध्यक्ष लहुजी शक्ती सेना पुणे), ॲड. एकनाथ दत्तात्रय जाशील (नेते अखिल भारतीय होलार समाज)व चंद्रकांत साठे (आरोग्य मुकादम मनपा) मा.वसंतराव वाघमारे (मा.पोलीस निरीक्षक) मा.संजीवनी देवकुळे (सामाजिक कार्यकर्त्या) मा.अंकुश साठे (सामाजिक कार्यकर्ते) विलास शेंडगे(सामाजिक कार्यकर्ते), दिपक लोखंडे (सामाजिक कार्यकर्ते), मा.सदाशिव वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते) मिराताई माने (सामाजिक कार्यकर्त्या) , .कुंडलिक मामा वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते) यांचा  सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास राजेश पांड्ये ,उपमहपौर सुनीता ताई वाडेकर ,महोत्सव समितीचे आयोजक परशुराम वाडेकर ,आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनवणे ,वरिष्ठ नेते बाबुराव घाडगे ,रवींद्र सालेगावकर ,बसवराज गायकवाड ,मोहन जगताप आप्पा वाडेकर व अतिशय मोजके असे बोपोडी परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते .

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading