Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने दुकानांची वेळ वाढविण्यासाठी सह्यांची मोहीम

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पुण्यातील निर्बंध काही शिथील झाले नाही. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकानांना दुपारी 4 पर्यंतच परवानगी आहे. तुळशीबागेत प्रामुख्याने महिला खरेदीसाठी खूप येत असतात.घरातील कामकाज आटपून दुपारी बाजारपेठेत खरेदीसाठी आल्यावर आताची 4 ची वेळ अपूरी पडत आहे त्यामुळे बाजारपेठत गर्दी होत आहे. त्यातच येणारे सणानिमीत्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे.अशावेळी शनिवार रविवार नागरिकांना सुट्टी असते त्यावेळी त्यांना इतर खरेदी करता यावी म्हणून वीकेंड लाॅकडाऊन न करता रात्री 8 वाजेपर्यंत दररोज दुकाने उघडण्यास परवानगी दिली पाहिजे या तुळशीबाग व्यापारी असोसिएशन च्या मागणी ला खरेदीसाठी येणारे नागरिकांनी सह्या करुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आमदार मुक्ता टिळक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून पाठींबा दर्शविला.. वेळ वाढवून द्यावा अशी मागणी व्यापारी यांच्या बरोबर नागरिकांची पण आहे त्यासाठी तुळशीबाग व्यापारी असोसिएशन च्या वतीने सह्यांची मोहीम घेण्यात आली..त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…नागरिकांना पण खरेदीसाठी पूरेसा वेळ मिळाला पाहिजे असे मलाही वाटते म्हणून मी व्यापारी यांच्या या मोहिमेत सहभागी झाले, आता नागरिकांनी दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी केल्यावर तरी सरकारने दखल घेतली पाहिजे असेही टिळक म्हणाल्या.
व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पण कमी होत आहे त्यामुळे निर्बंध शिथील केले पाहिजेत, अशी मागणी तुळशीबाग व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष नितीन पंडीत यांनी केली.
सदर कार्यक्रमास तुळशीबाग परिसरातील व्यापारी तसेच गणपती चौक लक्ष्मी रोड असोसिएशन चे व्यापारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading