Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

सीबीएसई दहावीचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार

नवी दिल्ली: सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांचा  निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार आहे. सीबीएसई कडून अवघ्या काही मिनीटापूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून ही माहिती देण्यात आली आहे. दहावीचे विद्यार्थी cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात.

दरम्यान, निकालासाठी 20 + 80 चे असा फॉर्म्युला ठरला आहे. प्रत्येक विषयात जास्तीत जास्त 100 गुणांचे मूल्यांकन केले, जाणार असून त्यापैकी 20 गुण पूर्वीच्या आतील मूल्यांकन असतील. याशिवाय उर्वरित 80 गुण नव्या पॉलिसीच्या आधारे दिले जातील. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या 80 गुणांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी 10 गुण वेळोवेळी घेण्यात आलेले युनिट परीक्षेचे आहेत, 30 मध्यावधी परीक्षेसाठी आणि 20 प्रीबोर्ड परीक्षेसाठी आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading