Thursday, June 18, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

ICMR – ‘कोव्हॅक्सिन’ लस डेल्टा प्लस विरुद्ध प्रभावी

नवी दिल्ली : जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील कोरोना लसीच्या संशोधनाबरोबरच त्यांच्या प्रभावाबाबत देखील संशोधन केले जात आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासात असा दावा केला आहे की, कोरोना लस कोव्हॅक्सिन ही डेल्टा प्लस व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रभावी आहे.

भारत बायोटेकची कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. यापूर्वी कोव्हॅक्सिनचा प्रभावीपणा कोरोना विषाणूविरूद्ध ७७.८ टक्के आणि नवीन डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध ६५.२ टक्के प्रभावी आहे. तर गंभीर लक्षणांच्या प्रकरणांमध्ये कोव्हॅक्सिन ९३.४ टक्के प्रभावी असल्याचे भारत बायोटेककडून सांगण्यात आले होते.

दरम्यान, भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर या लसीचा प्रभावीपणा जाणून घेताना लक्षणे नसलेल्या व्यक्तींमध्ये या लसीचा प्रभावीपणा ६३ टक्के, तसेच सौम्य, मध्यम आणि गंभीर कोरोनाचे लक्षणं असेलेल्या व्यक्तींमध्ये या लसीचा प्रभाव ७८ टक्के आणि कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये ही लस ९३ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे. यासह कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध ही लस कोरोनाशी लढा देताना ६५ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. या व्यतिरिक्त, काही दिवसांपूर्वी यूएस शीर्ष आरोग्य संशोधन संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने (एनआईएच) एक अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार, कोव्हॅक्सिन कोविड -१९ विषाणूच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावीपणे मात करते. एनआयएचने असेही सांगितले होते की, हा दावा दोन संशोधनांमधील डेटाच्या आधारे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading