Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

सहयाद्रीच्या आस्मानी संकटात , कार्यकर्ते पाठीवर हात ठेवून म्हणाले लढ…

पुणे : शहरातील साईनाथ मंडळ ट्रस्ट पुणे , युगंधर मित्र मंडळ संयुक्त विद्यमाने वाई तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गोळेवाडी, गोळेगाव, माऊली वाडी, वायगाव येथील कातकरी वस्ती या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मुलांना पुस्तके देण्यात आली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे मनोबल वाढावे, त्यांना जगण्याची उमेद मिळावी ह्या हेतूने कुसुमाग्रज ह्यांची” कणा” ही कविता पोस्टर स्वरूपात गावकर्यांना भेट देत त्यांचा पाठीवर वर सहकार्यचा हात ठेवत लढण्यास बळकटी दिली…..


साईनाथ मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष पीयूष शहा म्हणाले, “महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या लोकांवर आस्मानी संकट कोसळलेले आहे. ही मदत नसून श्री गणेशाचा प्रसाद म्हणून आम्ही आमच्या परीने काही जीवनावश्यक वस्तू आपणापर्यंत पोहोचवत आहोत ह्यात आमची कृतज्ञतेची भावना आहे. गोळेवाडी ,गोळेगाव , या गावातील लोकांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत , संकट आली तरी आणि रस्ते , शेती , पूल वाहून गेले तरी चिंता नसावी , माणुसकीची पूल सदैव उभा असेल आणि त्यात गणपती मंडळाचे कार्यकर्ते सदैव सोबत असतील, 


दोन किलो तांदूळ, दोन किलो गव्हाचे पीठ, 1 किलो मीठ, 1 किलो तेल पिशवी, 1 किलो रवा, अर्धा किलो, अर्ध किलो फरसाण,अर्धा किलो तूर डाळ,अर्धा किलो हरभरा डाळ, एक किलो साखर, अर्धा किलो बेसण पीठ ,चहा पावडर, मसाले, मीठ पुडा, बिस्किटे, लहानग्यांना पौष्टीक नाचणी सत्व, इ.चे किट तयार करून 50 कुटुंबांना त्याचे वाटप करण्यात आले. तसेच साडया, लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तके, याचेही वाटप करण्यात आले.


यावेळी गोळेवाडीचे सरपंच पुणे येथील साईनाथ मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष पीयुष शहा, युगंधर मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुर पोटे, प्रमोद नरे, नंदूशेठ ओव्हाळ , हर्षद वरे,स्वरुप देवरुखकर, मकूम शेख, वाई येथील अभिजीत सणस, प्रसाद रावळ ,सुनिल सूर्यवंशी,वाई तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नारायण शिंदे, भास्कर पोतदार, शेखर जाधव, नितीन फरांदे, संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दौलतराव पिसाळ उपस्थित होते.
यावेळी गोळेवाडीचे सरपंच अजय कदम ह्यांनी आभार मानले , वाई तालुका प्राथमिक शिक्षक मदत कमिटी ह्यांचे विशेष सहकार्य लाभले, शेखर जाधव सर , पार्वती चव्हाण फौंडेशन, स्मिता विचारे, कुमार अन्वेकर, नरेंद्र व्यास, ह्याचे सहकार्य लाभले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading