Monday, September 28, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागणीला आणखी एक मोठं यश

पुणे: आज पुणे येथे शासकीय विश्रामगृह येथे राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत जनगणनना करणेसाठी एक ऐतिहासिक ठराव पास करण्यात आला.सदर ठरवामुळे महाराष्ट्र मधील जातिनिहान जनगणना करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सदर जातिनिहान जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ सदैव आक्रमक राहिला आहे. वेळो वेळी आयोगाच्या सदस्यांना जनगणना करण्यासाठी युवा अध्यक्ष चेतन शिंदे यांनी वेळो वेळी पाठपुरावा केला होता. मागच्या महिन्यात १३ व १४ जुलै रोजी पुणे येथे झालेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत सुद्धा चेतन शिंदे यांनी ओबीसी समाज हा समाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या अद्यापही मागासलेला आहे त्यामुळे या समाजाची असलेली सत्य परिस्थितीत समोर येणे आवश्यक आहे. यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात नितांत आवश्यकता आहे. यावर विशेष चर्चा राज्य मागासवर्गीय आयोग सदस्य डॉ.बाबाराव तायवाडे साहेब यांचे सोबत केली होती व त्यांनी सदर विषय लवकरच मार्गी लागेल असे आश्वाशीत केले होते. त्याच आधारे आज झालेल्या बैठकीत जनगणना करणे संदर्भात ठराव पास करण्यात आला आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेला या ऐतिहासिक ठरावाचे सर्व ओबीसी समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading