SBI तर्फे योनो आणि योनो लाइटमध्ये ‘सिम बाइंडिंग’ सुविधा लाँच
मुंबई : भारतातील सर्वात मोठी कर्जपुरवठादार स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) योनो आणि योनो लाइटमध्ये ‘सिम बाइंडिंग’ ही नवी व सुधारित सुविधा लाँच केली आहे. या प्लॅटफॉर्म्सच्या नव्या आवत्तीमध्ये ग्राहकांचे विविध डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण होणार आहे. सिम बाइंडिंग सुविधेमुळे योनो आणि योनो लाइट केवळ बँकेकडे नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकाच्या सिमवरच चालणार आहे.
सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांसह योनो आणि योनो लाइटची नवी आवृत्ती वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांचे मोबाइल ॲप अद्यावत करावे लागेल तसेच या ॲप्सवरील एकदाच करावी लागणारी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नोंदणी प्रक्रियेमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाच्या (आरएमएन) सिमची बँकेबरोबर पडताळणी पूर्ण करून नोंदणी पूर्ण केली जाते. ग्राहकांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचे सिम असलेल्या उपकरणावरूनच नोंदणी करण्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
एसबीआयमधील डीएमडी (धोरण) आणि मुख्य डिजिटल अधिकारी राणा आशुतोष कुमार सिंग म्हणाले, ‘योनो आणि योनो लाइट या एसबीआयच्या दोन सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सवर सिम बाइंडिंग सुविधा लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. या नव्या सुविधेच्या मदतीने सर्व ग्राहकांना अधिक चांगली सुरक्षितता आणि सोयीस्कर व सुरक्षित ऑनलाइन बँकिंग अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. एसबीआयमध्ये आम्ही कायमच ग्राहकांना त्यांच्या घरातच राहून डिजिटल बँकिंग सेवा वापरण्यासाठी तसेच योनो व योनो लाइटवरील एकछत्री बँकिंग व जीवनशैलीविषयक सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देत असतो.’
योनो व योनो लाइट एक मोबाइल उपकरण- एक युजर – एक आरएमएन या मूलभूत नियमासह काम करते. मात्र, ग्राहकांना बँकेकडे नोंदणीकत मोबाइल क्रमांकाचे सिम वापरून एकाच मोबाइलवर योनो व योनो लाइटचा लाभ घेता येईल.
जर ग्राहक बँकेकडे न नोंदवलेला मोबाइल क्रमांक वापरत असेल, तर त्यांना योनो व योनो लाइटवरील नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नवी सिम बाइंडिंग सुविधा युजरला योनो व योनो लाइट ड्युएल सिम हँडसेटवर वापरण्याची मुभा देईल. मात्र, त्यासाठी नोंदणीकत मोबाइल क्रमांकाचे सिम उपकरणात कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
योनोविषयी अधिक माहितीसाठी ग्राहकांना 1800111101 वर संपर्क करता येईल, तर योनो लाइटविषयी अधिक जाणून घेण्यासाठी 1800112211 वर संपर्क साधावा.
