Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात पाऊस 95% कायम राहणार

पुणे: भारतीय हवामान विभागाकडून देशातील ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान चा पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे ऑगस्ट ,आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस 95 टक्के इतका कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 95 टक्के ते105टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. दरम्यान जुलै महिन्यात हवामान विभागाकडून दुसऱ्या आठवड्यात मोठा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला होता.

ऑगस्ट महिन्याचा अंदाज बघितला तर कोकणात सरासरी पेक्षा अधिक पाऊस बघायला मिळेल अस हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र मध्य महाराष्ट्रातील धुळे ,नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली त देखील सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading