पुणे शहरात गेल्या 24 तासात 142 नवीन कोरोना रुग्ण
पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आलीआहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पण कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 142नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 243रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 87हजार 563 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख76 हजार748 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 9रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 7तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8779जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2306अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 218रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7200 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
