fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर – उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे शिष्यवृत्ती’ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई शहर – उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेवून व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी,१२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड शाळेचा दाखला मार्कशीट २ फोटो पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा यासह दोन प्रतीत पूर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह आपला अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे विकास महामंडळ (मर्या), मुंबई- गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रूम नं. ३३. बांद्रा (पू), मुंबई ४०००५१ या पत्त्यावर १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठवावा, असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय मुंबई शहर उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading