fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Rain Alert – पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे: उद्या  पुणे, सातारा , रायगड  रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.  पुणे वेधशाळेने  दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चार जिल्ह्यांत पुढील दोन-तीन तासांत वेगवान वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या संपूर्ण राज्यात पावसाची विश्रांती असेल. 4 जुलै पर्यंत राज्यात कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.

अरबी समुद्रात वेगावन वाऱ्यांची शक्यता मागील आठवड्यात महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोपडल्यानंतर पावसानं उत्तर भारताकडे वाटचाल सुरु केली आहे. आज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट  जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तर अरबी समुद्रासह महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी परिसरात वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात 5 ऑगस्ट नंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading