झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे अण्णा भाऊंना अभिवादन
पुणे : झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे येरवडा येथील सांस्कृतिक कला भवन येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, गणेश लांडगे, परमेश्वर लोंढे, दिलीप आबा कांबळे, महादेव मोरे, प्रदीप पवार, महंमद शेख, सुरेखा भालेराव, काशीनाथ गायकवाड आणि आमदार सुनील कांबळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भगवानराव वैराट म्हणाले की अण्णा भाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे. महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील थोर यासे साहित्यकार अण्णा भाऊ आहेत. अशा थोर साहित्यकाराच्या साहित्याचा आलेख मोठा आहे.
