Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

राजधानीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

नवी दिल्ली : साहित्यरत्न , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त  निधी पांडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही  यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली  वाहिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading