fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

Pune – पाणीपुरवठ्याचे काम मर्जीतील ठेकेदाराला देण्यासाठी खटाटोप

पुणे: खडकवासला रोड वॉटर पंपिंग स्टेशन वारजे, आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी विविध कामासाठी मागवलेल्या सुमारे 38 कोटी रुपयांची निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे उघड झाले आहे .विशिष्ट ठेकेदाराने डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविण्याचे उघड झाल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

रॉ वॉटर उचलणे त्याचे शुद्धीकरण टाक्यामध्ये   भरणे टाक्यातून पाण्याचे वितरण करणे आणि उंचीच्या  भागात अथवा कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागात बूस्टर पंप बसविण्याच्या या कामासाठी निविदा आहेत. खडकवासला रोड वॉटर पंपिंग पेज 1,व2 ,जूने वारजे जलकेंद्र गणपती माथा पंपिंग स्टेशन, पाषाण पम्पिंग स्टेशनचे बूस्टर पंप तीन वर्षाकरिता चालण्यास देण्यासाठीची नऊ कोटी 41 लाख वारजे शुद्धीकरण केंद्र फेज 1 व 2
तीन वर्षाकरिता चालविण्यासाठी दहा कोटी 74 लाख रुपये अशा सुमारे 38 कोटी रुपयांची निविदा महापालिकेने मे महिन्यात मागविल्या होत्या.


त्यानुसार खडकवासला वॉटर पंपिंग साठी दोन निविदा प्राप्त झाल्या तर वारजे जलशुद्धीकरणा यासाठी एकच निविदा प्राप्त झाली. त्यामुळे पुरेशी स्पर्धा न झाल्याने त्यास मुदतवाढ देणे अपेक्षित होते. परंतु मुदतवाढ न देता खात्याने परस्पर स्वतःच्या अधिकारात ते नवी प्रक्रिया रद्द करून निविदा प्रक्रिया राबवली. त्यामध्ये प्रत्येकी एकच निविदा प्राप्त झाली तर या खात्याने या निविदा उघडण्याची परवानगी मागितली मात्र प्रकारची दक्षता विभागाच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत खात्याकडे विचारणा केली .ठेकेदाराने मागणी केल्यामुळे हे निविदा काढण्याचे कारण खात्याकडून सांगण्यात आले  .चौकशीत ठेकेदारांनी वारजे जलशुद्धीकरण केंद्राचे कामांच्या निविदा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. परंतु खात्याने दिली तसेच त्यासाठी कोणती मान्यता देतात पाणी पुरवठा खात्याचे अधीक्षक अभियंत्यांनी स्वतःच्या परस्पर निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे .

स्थायी समितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तेव्हा विशेष कंपनीच्या ठेकेदाराला एक काम मिळावे हा प्रकार केल्याचे लक्षात आल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
– सुनील इंदुलकर उपायुक्त सेवकवर्ग पुणे महापालिका

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading