‘थडम’च्या रिमेकमध्ये आदित्य रॉय कपूरची एन्ट्री
दाक्षिणात्य हिट चित्रपट ‘थडम’च्या हिंदी रिमिक्स मध्ये आता सिद्धार्थ मल्होत्रा ऐवजी आदित्य रॉय कपूर दिसणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूर ला यापूर्वीच साईन करण्यात आले आहे. दिग्दर्शक ऍटलीच्या चित्रपटात शाहरुख खान डबल रोल साकारत आहे. त्या चित्रपटाची कहाणी देखील ‘थडम’ सारखीच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सिद्धार्थने हा चित्रपट सोडला असल्याची चर्चा आहे. ‘थडम’चा हिंदी रीमिक्स दिग्दर्शक वर्धान केतकर करणार आहेत. आदित्य रॉय कपूरने गेल्या आठ वर्षांमध्ये एकही सोलो हिट चित्रपट दिलेल्या नाही आता ‘थडम’चा रिमेक त्याच्यासाठी फायदेशीर ठरतो का नाही हे पाहावे लागेल. याशिवाय त्याच्याकडे ‘ओम’ हा चित्रपटही आहे. ‘थडम’ हा आयडेंटीकल ट्विन्स असलेल्या भावांवर आधारित सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.
ADITYA ROY KAPUR IN #TAMIL REMAKE… #AdityaRoyKapur to star in #Hindi remake of #Tamil film #Thadam… The film – not titled yet – is produced by #BhushanKumar and #MuradKhetani… Directed by debutant Vardhan Ketkar… Starts Sept 2021. pic.twitter.com/w2Ao4crZ6n
— taran adarsh (@taran_adarsh) July 29, 2021
