सीबीएसईच्या 12 वीचा निकाल जाहीर
दिल्ली : सीबीएसईच्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. सीबीएसई बोर्डाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता यईल. यामध्ये एकूण 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि इतर राज्य मंडळाला 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज हा निकाल जाहीर झाला. दरम्यान 1 ऑक्टोबरपासून कॉलेजचे नियमित सत्र सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात
आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12 वी निकालाचीही उत्सुकता आहे.राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार आहे. त्यात बोर्डाचे प्रशासकीय कामही राहिले आहे. यामुळे राज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात लागणार आहे.
