पुढील तीन-चार दिवसात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज
पुणे: महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. तर अनेकांनी आपले घर गमावले या महापुरानंतर आता राज्यातील पावसाने विश्रांती घेत असल्याचे दिसत आहे .मात्र पुढील तीन-चार दिवसात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासात राज्यातील ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
