शाळांच्या फी मध्ये 50 टक्के सवलत हवी
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शाळा ऑनलाइन सुरू आहेत. मात्र पालकांकडून शाळा पूर्ण फी वसूल करत आहेत. या विरोधात पालकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पालकांना काहीसा दिलासा दिला आहे. शैक्षणिक शुल्का मध्ये 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय दिला आहे, मात्र ही फी अत्यंत तोकडी असून ही सवलत 50 टक्के असावी अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत.
याबाबत बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले, कोरोना महामारी’मुळे संपूर्ण राज्यात मुलांना Online शिक्षण दिलं. शाळांचा खर्च शून्यावर आला. लाॕकडाऊन काळात सामान्य माणसं उद्ध्वस्त झाली. राज्य सरकार व शिक्षण विभागाने सर्व शाळांची 50% फीस माफ करणे अपेक्षित होते, तशीच मागणी होती. संवेदनशून्य सरकारने 15 टक्के फीस माफ केली हे निषेधार्ह आहे. ‘मा. वर्षा गायकवाड मॅडम, कपड्याच्या दुकानात सुद्धा 20 टक्के डिस्काउंट असतो हे लक्षात ठेवा.’ सन्माननीय उद्धव ठाकरे, अजित पवार आणि वर्षा गायकवाड यांना सर्वसामान्य गोरगरिबांची दुःख दिसत नाहीत…
पालक संघ वारजे चे कालिदास जाधव म्हणाले, अतोनात प्रयत्न करून सुप्रीम कोर्टात पालकांनी न्याय मिळवला 15 टक्के फी कपातीला मान्यता मिळाली आहे. .ही फी माफी शैक्षणिक वर्षे 2020 -21 साठी लागू केली आहे. 2021 -22 शैक्षणिक वर्षासाठी जी फी पंधरा टक्के कपात केली आहे. ती 50 टक्के फी कपात करावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
बहुतेक शाळांची नफेखोरी ही 200 पटीने आहे.ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या खूप वर्ष भरपुर पैसे कमवत आहेत.
कोरोनाच्या या पॅनेडमिक काळात पालकांचा विचार करून शाळांनी काय प्रमाणात पालकांना सूट द्यावी असे जाधव यांनी नमूद केले आहे.
