Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 304 नवीन रुग्ण

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या वर आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची  संख्या वाढल्याने महानगरपालिकेचीव आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 304नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. तर 196रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे. पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 86 हजार 669 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार 324 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 10 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8756 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2589 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 226 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8756 स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading