Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य पदावरुन राजकुमार ढाकणे यांना काढले

मुंबई : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य पदावर राजकुमार भुजंगराव ढाकणे यांची नियुक्ती नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती या वर्गात करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याबाबतचा अहवाल पोलीस महासंचालकांनी सादर केला.

सदरील अहवालाचा विचार करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 22 प तसेच महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्ट (1904 चा 1) च्या कलम 19 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार शासनाने त्यांना या पदावरुन काढून टाकले आहे. याबाबतची अधिसूचना गृहविभागाने निर्गमित केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading