वाई,जावळी,कराड, पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेची खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली पाहणी
वाई:वयाची 81 पूर्ण,शरद पवार साहेब 2 महिने वयाने मोठे,एका मित्राने दुसऱ्या मित्राला संकटावेळी साद घातली,बर ती एकदा नाही तर अनेकवेळा,आणि आपल्या मित्राच्या पाठीशी खासदार श्रीनिवास पाटील साहेब अनेक वेळा उभे राहिले,अनेक संकटांशी एकत्र लढले,जिंकले ते पण सर्वसामान्य जनतेसाठी.एका पाऊसाने लढायला शिकवलं तर दुसऱ्या पाऊसाने अक्षरशः हाहाकार उडवून दिला.
साहेब एव्हाना दिल्लीत अधिवेशनासाठी पोहचले होते,माझ्या जनतेचे प्रश्न सुटावे म्हणून अधिवेशनात आवाज उठवीत होते,तेवढ्यात मतदार संघातून साहेबांना फोन गेले,वाई,जावळी,कराड, पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुःखद घटनेची माहिती मिळताच साहेब तडक मिळेल त्या विमानाने आज पहाटे पुण्यात आणि मग वाईला दाखल झाले.
नीरा नदी ओलांडली मकरंद आबांकडून परिस्थितीची माहिती घेऊन खासदार साहेब मकरंद आबांसोबत महाबळेश्वर येथे प्रशासकीय नियोजनांची मिटींगला हजर राहिले,तिथे सर्व अधिकारी यांना मार्गदर्शन केले,आपल्या प्रशासकीय राजकिय अनुभवाचे कौशल्य आपल्या लोकांसाठी संकटाच्या काळात पणाला लावण्याची साहेबांची नेहमीच तयारी असते.महाबळेश्वर वरून आबांचा निरोप घेऊन साहेब कोंढावळे कडे रवाना होतात.
मेणवली,अभेपुरी,जांभळी येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीचा तेथील शेतकऱ्यांनकडून आढावा घेत कोंढावळे कडे साहेब मार्गस्थ होतात,भर पावसात चिखल तुडवत छत्री नाकारत कोंढावळे ग्रामस्थांची भेट घेत प्रशासकीय अधिकारी, गावकरी, मदत देणारी लोक,संस्था यांना साहेब मार्गदर्शन करतात आणि तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो, ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक अतिवृष्टीमुळे दगावले त्यांचे सांत्वन करतात.
मनात दुःखाची झालर घेऊन परतीचा प्रवास सुरु होतो,साहेब सुद्धा सामान्य कुटूंबातून लहानाचे मोठे झाले त्यामुळे त्यांना सामान्य जनतेच्या सुख दुःखांची पूर्ण जाणीव आहे.
बाधितांचे अश्रू पुसण्यासाठी हजारो किलोमीटर चा प्रवास करून साहेब सातारला दाखल झाले आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन साहेब उद्या दिल्लीला रवाना देखील होतील.
