डेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात नद्यांचे पाणी वाढल्याने आणि रेल्वेच्या काही कामांमुळे डेक्कन आणि इंद्रायणी एक्सप्रेससह तब्बल ५२ रेल्वे गाड्या आज शनिवार २४ ते २७ जुलैपर्यंत म्हणजेच पुढील चार रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे-
अहमदाबाद, गदग- मुंबई, कोल्हापूर- मुंबई, पंढरपूर- मुंबई, अमरावती-
मुंबई, हैदराबाद- मुंबई आणि पनवेल- नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.

मागील चार दिवसांपासून मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच कोकण आणि दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरही दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे लोणावळा- कर्जत दरम्यानच्या घाटात अद्याप अपलाईनचे काम सुरू आहे. तसेच काही दिवसांपासून रेल्वे रद्द झाल्याने रेक लिंक विस्कळीत झाल्या आहेत. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या ५२ रेल्वे गाड्या चार दिवस रद्द करण्यात आल्या आहेत .

Leave a Reply

%d bloggers like this: