‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक

प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा 15वा सिझन म्हणजेच ‘बिग बॉस ओटीटी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन गेले कित्येक सिझन बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करत होता. मात्र यावेळी त्याची जागा दुसऱ्या व्यक्तीने घेतली. या नव्या सिझनचे ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या भागाचे सूत्रसंचालन बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर करणार असून सलमान टिव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या एपिसोड्सचे सूत्रसंचालन करणार आहे. या नव्या सिझनचा प्रीमियर हा टीव्हीवर होणार नसून पहिल्या सहा आठवड्याचे एपिसोड्स हे ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. करणच्या आधी बिग बॉस-13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या नावाचा सूत्रसंचालकसाठी विचार करण्यात आला होता. पण नंतर करणचे नाव निश्चित करण्यात आले. या नव्या सिझनमध्ये सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकही येणार आहेत. या लोकांची आणि सेलिब्रिटींची तगडी स्पर्धा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: