रायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले

रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. मुसळधार पावसामुळे बचाव पथक पोहोचण्यास उशीर झाला. येथील ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ४४ मृतदेह बाहेर काढले असून बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. आज जिल्ह्यातील हिरकणीवाडीत दरड कोसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून येथील नागरिक भयभीत झाले आहेत.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या हिरकणीवाडीत आज दरड कोसळली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तळीयेतील दरड दुरर्घटनेनंतर ही घटना घडल्यानं हिरकणीवाडीत भीतीचं वातावरण आहे. या घटनेनंतर नागरिकांना जवळच्या पाचाड गावात हलवलं जात आहे.

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीनं तडाखा दिला. पाऊस इतका भयंकर होता की, असंख्य गावं पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी गावांमध्ये शिरल्यानं तीन दिवस झाले तरी परिस्थिती अद्याप जैसे थे असल्याचं चित्र आहे. दरम्यान, एनडीआरएफसह लष्कर, नौदल, हवाई दलाला मदत व बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज तळीये गावाला भेट देऊन आढावा घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: