भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन

पुणे : भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातर्फे ए.आय.सी.टी.ई.ट्रेनिंग अँड लर्निंग अकँडमीच्या सहयोगाने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते झाले. आठवडाभराच्या या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात प्राचार्य डॉ आनंद भालेराव,डॉ के बी सुतार,आय.आय. टी. दिल्लीचे प्रा.डॉ.एस.पी.सिंग आणि २५० जण सहभागी झाले.

डॉ माणिकराव साळुंखे म्हणाले,’डिझाईन इंजिनिअर्स हे अभियांत्रिकीतील कलाकार आहेत.जेव्हा अभियांत्रिकी तांत्रिक उपाय देत असते तेव्हा त्याला सौंदर्य प्रदान करण्याचे काम डिझाईन इंजिनियर्स करतात.त्यांच्या योगदानाने मानवी प्रगती चंद्र ताऱ्यांपर्यंत पोहोचली.अशा योगदानाची गरज नेहमीच राहील.’डॉ.आनंद भालेराव यांनी अभियांत्रिकीच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले,’कोविड साथीच्या काळाचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम झाला असून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम मधून ज्ञान वृद्धीचे काम होते. डॉ एस पी सिंग यांनी इंटरनेट व थिंग्स,थ्री -डी प्रिंटिंग अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.डॉ के बी सुतार यांनी स्वागत केले.डॉ के ए राडे आभार मानले.डी डी मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ.आनंद भालेराव यांनी अभियांत्रिकीच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले,’कोविड साथीच्या काळाचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम झाला असून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम मधून ज्ञान वृद्धीचे काम होते. डॉ एस पी सिंग यांनी इंटरनेट व थिंग्स,थ्री -डी प्रिंटिंग अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.डॉ के बी सुतार यांनी स्वागत केले.डॉ के ए राडे आभार मानले.डी डी मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: