लिंबराज महाराज देवस्थानतर्फे १०१ वारक-यांना धान्य किट

पुणे : शेकडो वर्षांची परंपरा असलेली आषाढीची वारी मागील वर्षी आणि याही वर्षी खंडित झाली. कोविड महामारीमुळे अनेकांसमोर रोजगारासह दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न उभा राहिला. त्यामुळे पुण्यातील ऐतिहासिक बाजीराव रस्त्यावरील लिंबराज महाराज देवस्थानतर्फे १०१ वारक-यांना धान्य किट देण्यात आले. पायी वारीमध्ये सहभागी होऊन पांडुरंगाची भक्ती करणा-यांना हा प्रसाद देवस्थानतर्फे देण्यात आला.
लिंबराज महाराज मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला ह.भ.प.माऊली टाकळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष धनंजय बडदे, मुख्य विणेकरी संदीप सपकाळ, रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त आदर्श शिक्षक शशिकांत तळेकर, गुरुदेवदत्त पतसंस्थेचे संचालक अ‍ॅड.उल्हास धुमाळ, कार्यक्रमाचे संयोजक अखिल झांजले, अरविंद लांडगे, विकास पांचाळ आदी उपस्थित होते.
अखिल झांजले म्हणाले, महाराष्ट्रात पायी वारी करण्याकरीता लाखो वारकरी रस्त्यावर येतात. मात्र, दोन वर्षांपासून कोविडचा धोका लक्षात घेता कोणत्याही प्रकारची गर्दी वारक-यांनी केली नाही. स्वयंशिस्तीने होणारा सोहळा घरबसल्या देखील भक्तीभावाने करता येतो, याचे दर्शन वारक-यांनी घडविले. वारीमध्ये जाणा-या अशा वारक-यांना धान्य किट देण्याचा उपक्रम राबवून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असेही त्यांनी सांगितले. हेमंत जाधव यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड.स्वप्निल शेठ यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: