मेडिक्विन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत डॉ. निशा पानसरे ठरल्या उपविजेत्या

पुणे : मेडिक्विन मिसेस महाराष्ट्र या राज्यस्तरीय सोंदर्य स्पर्धेत पुण्यातील स्त्री रोग तज्ज्ञ आणि वंधत्व चिकित्सा तज्ज्ञ डॉ. निशा निखिल पानसरे या व्दितीय उपविजेता ठरल्या आहेत. पानसरे यांनी ब्युटी विथ ब्रेन हा किताब मिळवला, मेडिक्विन ही देशभरातील डॉक्टरांसाठी सोंदर्य स्पर्धा घेतली जाते. 

बालेवाडीतील हॉटेल आर्किड मध्ये 13 ते 15 जुलै दरम्यान ही स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये राज्यातून 300 महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या.  या सस्थेच्या संस्थापक डॉ. प्रेरणा बेरी कालेकर, समन्वयक डॉ. प्राजक्ता शहा, दिग्दर्शक आणि मार्गदर्शक योगेश पवार, आणि नामांकित ज्युरी समिर धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत सोंदर्य स्पर्धेतील स्पर्धकांचे सोंदर्य, कौशल्य , सामाजिक कार्य आणि इतर अवगत गुणांची पारख करून विजेत्याची निवड करण्यात आली. स्त्री आरोग्य हे मेडिक्विन संस्थेचे  ब्रीदवाक्य व वैशिष्ट आहे.आरोग्य विषयक उपक्रम संस्था राबवित असते. या स्पर्धेमुळे उत्साही आणि अष्टपैलू डॉक्टरांसाठी एक व्यासपीठ तयार झाले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: