मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुणे: मानवहित लोकशाही पक्षाने अनुसूचित जाती जमातीतील समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर  पक्षाच्या विविध मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले गेले.

या आंदोलनाला सुरेश थोरात, राजा अडाळे, विकास गवळी, निलेश थोरात, सागर साठे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मानव हीत लोकशाही पक्षाच्या मागण्या
1) अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लोकसंख्येनुसार वर्गीकरण करण्यात यावे.
2) आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे संगमवाडी पुणे स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे
3) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा
4) आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग नेमण्यात यावे
5) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एक ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी
6) गायरान जमीन तारखांना जमीन नावावर करून देणे
7) ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण मोफत द्यावे
8) पुणे ते आंबील ओढा मधील झोपडपट्टी धारका ना न्याय मिळाला पाहिजे.

Leave a Reply

%d bloggers like this: