KGF Chapter 2 चा धुमाकूळ, मिळाले रेकॉर्डब्रेक व्ह्यूज

साऊथ सुपरस्टार यश याच्या ‘केजीएफ’ (KGF) या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये बक्कळ कमाई केली आहे.‘केजीएफ’. या चित्रपटाचा पहिला भाग १ डिसेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षकांमध्ये ‘केजीएफ २’ ( KGF Chapter 2) या चित्रपटाची जोरदार चर्चा चालली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट १६ जुलै २०२१ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी अजूनही या चित्रपटाची प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली नाही. पण या चित्रपटाचा टीझर मोठ्या संख्येने पाहिला जात आहे. जानेवारी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या टीजरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. प्रेक्षक सातत्याने हा टीझर बघत आहेत. यामध्ये यशसोबत संजय दत्त, रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टीची झलक पाहायला मिळते. या टीझरला जोरदार व्ह्यूज मिळत आहेत. ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाच्या टीझरला यूट्यूबवर २०० मिलियन म्हणजेच २० कोटी पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या टीझरला ८.४ पेक्षाही जास्त लाईक्स देखील मिळाले आहेत.

‘केजीएफ चॅप्टर २’ चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर २४ तासातच सुपरहिट झाला होता. या टीजरला २४ तासात ६ कोटी व्ह्यूज मिळाले होते. ३७ लाख लाईक्स मिळाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: