OLA इलेक्ट्रिक स्कूटरला डिमांड, 24 तासात विक्रमी 1 लाख बुकींग

पुणे : ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी पहिल्या २४ तासातच विक्रमी १ लाख नोंदणी झाल्याचे ओलाने आज जाहीर केले. त्यामुळे ओला इलेक्ट्रिक स्कूटर ही जगातील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात पूर्वनोंदणी झालेले वाहन ठरले आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरने १५ जुलैच्या संध्याकाळपासून पूर्वनोंदणीला सुरुवात केली. ओला स्कूटरसाठी olaelectric.com यावरून ४९९ रुपयांना नोंदणी करता येऊ शकते. या योजनेला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. असून विक्रमी संख्येत स्कूटरची नोंदणी झाली आहे.

ओलाचे अध्यक्ष आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल म्हणाले, ‘आमच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनासाठी देशभरातल्या ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल या मागणीतून दिसून येत आहे. शाश्वत दळणवळणाच्या दिशेने जगाला नेण्याच्या आमच्या ध्येयाच्या बाजूने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे. ही तर फक्त सुरुवात आहे.’

योग्य वेग, अभूतपूर्व रेंज, सर्वाधिक बूट स्पेस आणि जोडीला प्रगत तंत्रज्ञान यांसह ओला स्कूटर क्रांतिकारी अनुभव देईल आणि ग्राहक विकत घेऊ शकतील अशी सर्वोत्तम स्कूटर असेल. व्यापक पातळीवर सर्वांना उपलब्ध होऊ शकेल अशी त्याची किंमत असेल. साऱ्या जगासाठी ओला स्कूटरची निर्मिती भारतात होईल. भारतातील तमिळनाडू येथील जगातल्या सर्वात मोठ्या, सर्वात आधुनिक आणि शाश्वत दुचाकी वाहनांच्या ओला फ्युचर फॅक्टरी येथे हे उत्पादन होणार आहे. ओला फ्युचर फॅक्टरीची पहिली पातळी लवकरच पूर्ण होत असून लगोलग येथे कामकाजाला सुरुवात होईल. त्यापुढच्या वर्षी १० दशलक्ष वार्षिक क्षमतेने वाहनांची निर्मिती होणार आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: