अभिनेत्री तापसी पन्नूने सुरू केले स्वतःचे प्रॉडक्‍शन हाऊस

कंगणा रणावत, अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रा यांच्यापाठोपाठ आता तापसी पन्नूनेही आपल्या प्रॉडक्‍शन हाऊसची घोषणा केली आहे. या प्रॉडक्‍शन हाऊसचे नाव “आऊटसायडर्स फिल्म्स’ असे ठेवले आहे. या प्रॉडक्‍शन हाऊससाठी तापसीने प्रांजल खांडदियाबरोबर भागीदारी केली आहे.

प्रांजल खांडदियाने यापूर्वी “सुपर 30′, “83′, “सुरमा’, “पीकू’ आणि “मुबारका’ सारख्या सिनेमांचे प्रॉडक्‍शन केले आहे. आपल्या प्रॉडक्‍शन हाऊसची घोषणा करताना तापसीने त्यामागील कारणही सांगितले आहे.

तापसीला गेल्यावर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रवाहात आपण टिकाव धरू शकू याचा आपल्याला अंदाज नव्हता. आता तर या प्रवाहात आपल्याला पोहायलाही यायला लागले आहे.

या प्रवासात ज्यांनी आपल्यावर प्रेम केले त्या सर्वांचे तापसीने आभार मानले आहेत. आता जबाबदारी अधिक वाढली आहे, त्याचे भानही तापसीला आहे. म्हणूनच आता फिल्म इंडस्ट्रीच्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच प्रॉडक्‍शन हाऊस सुरू केले असल्याचे तापसीने म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: