संत ज्ञानेश्वर उर्दू ई लर्निग शाळा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : येरवडा येथील संत ज्ञानेश्वर उर्दू ई लर्निग शाळा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाचा उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

या ई लर्निंग शाळेमुळे येरवडा विश्रांतवाडी परिसरातील उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना आता ई-लर्निंग सुविधा उपलब्ध झाली आहे. याप्रसंगी या कामाचा पाठपुरावा करणाऱ्या नगरसेविका व गटनेत्या रिपब्लिकन पक्ष फर्जाना आयुब शेख यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आयुब भाई शेख नगरसेविका शीतल सावंत, परशुराम वाडेकर यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: