क्रिती सेनॉन आणि सईच्या ‘मिमी’ चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेला व क्रिती सेनॉन आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिमी’ चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. विनोदी संवाद आणि इमोशनल ड्रामा यामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना आवडत आहे. लुका छुपी, बाला आणि हिंदी मिडीयमच्या यशानंतर दिनेश विजायन हे ‘मीमी’ हा वेगळ्या विषया वरील चित्रपट घेवून आले आहेत. या चित्रपटांचे दिग्दर्शन मराठमोळ्या लक्ष्मण उत्तेकर याने केले आहे. लुका छुपी नंतर त्याचा हा दूसरा चित्रपट आहे. पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक, मनोज पाहवा हे या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत.

सरोगेट मदर म्हणजे काय? इथपासून ते सरोगेट मदर बनण्याचा क्रीतीचा प्रवास हा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.  आज या चित्रपटाचा ट्रेलर तिने शेअर केला आहे. क्रिती लिहिले की, “या अनपेक्षित प्रवासासाठी मिमी सर्व काही करते. ही मिमी खास तुमच्यासाठी.. आपल्या कुटुंबासमवेत या कथेची छोटीशी झलक पाहा… “. हा चित्रपट 30 जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.

भूमिकेसाठी वाढवले तब्बल 15 किलो वजन 

क्रिती सेनॉन या चित्रपटात सरोगेट मदरच्या भूमिकेत आहे. क्रितीने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, “या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मी 15 किलो वजन वाढवले ​​आहे. दिग्दर्शक लक्ष्मणने मला आधीच सांगितले आहे की मी या भूमिकेसाठी कमजोर दिसणे उपयोगाचे नाही, म्हणून मला वजन वाढवावे लागले. वजन वाढवणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी वजन वाढवण्यासाठी कसरत करणेही सोडून दिले आणि खूप गोड पदार्थ खायाला सुरूवात केली.”

Leave a Reply

%d bloggers like this: