fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

पीएमपी – मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन नवीन बसमार्ग तर भोसरी ते भेकराईनगर या बसमार्गाचे कासारवाडी रेल्वे स्टेशन मार्गे विस्तारीकरण

पुणे : पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक ११अ  मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन हा नवीन बसमार्ग आज दि. १३ जुलै २०२१ पासून सुरू करण्यात आला. तसेच मार्ग क्र. १४८ अ भोसरी ते भेकराईनगर या मार्गात बदल करून ही बससेवा देखील मार्गे कासारवाडी रेल्वे स्टेशन आजपासून सुरू करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका व स्थायी समिती सदस्या आशा धायगुडे शेंडगे यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, समन्वयक अधिकारी तथा पिंपरी आगार व्यवस्थापक संतोष माने, भोसरी आगार व्यवस्थापक रमेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते  संजय शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्रमांक ११अ  मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन या बससेवेचा मार्ग मार्केट यार्ड-स्वारगेट-अप्पा बळवंत चौक-मनपा-शिवाजीनगर-मुळा रोड-खडकी बाजार-बोपोडी-दापोडी-पिंपळे गुरव-सृष्टी चौक-कासारवाडी रेल्वे स्टेशन असा असणार आहे.  तसेच मार्ग क्र. १४८ अ भोसरी ते भेकराईनगर या बससेवेच्या मार्गात बदल करून ही बससेवा आजपासून भोसरी-लांडेवाडी-एमआयडीसी-भोसरी पोलीस चौकी-नाशिक फाटा-कासारवाडी रेल्वे स्टेशन-सृष्टी चौक-पिंपळे गुरव-दापोडी-बोपोडी-खडकी बाजार-सादलबाबा-येरवडा-बंड गार्डन-पुणे स्टेशन-वेस्ट एंड-पुल गेट-फातिमानगर-वैदूवाडी-मगरपट्टा कॉर्नर-हडपसर-एनआयबीएम-भेकराईनगर या मार्गाने जाईल.

मार्ग क्रमांक ११अ  मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन हि बससेवा सध्या दर सव्वा तासाने उपलब्ध आहे. तर  मार्ग क्र. १४८ अ भोसरी ते भेकराईनगर ही बससेवा दर ४० मिनिटांनी उपलब्ध आहे. प्रवाशी प्रतिसादानुसार या मार्गावर आणखी बसेस वाढवण्यात येतील.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading